शासकीय इतमामात मेजर सुनील शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार   

मंचर, (प्रतिनिधी) : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील मेजर सुनील सोनबापू शिंदे  यांचे पुणे येथे लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये आजाराने शनिवारी निधन झाले. ते३९ वर्षाचे होते. यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्यावर अवसरी खुर्द येथील वैकुंठ भूमीत शासकीय इतमामात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह लष्करातील अधिकारी उपस्थित होते.
 
सन २००६ मध्ये त्यांची लष्करात भरती झाली. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार या परिसरात त्यांनी देशाची सेवा केली आहे. त्यांना मेजर म्हणून बढती त्यांना मिळाली होती. ते आजारी पडल्यामुळे पुण्याच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे अवसरी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहाची फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अवसरी खुर्द ग्रामपंचायत व लष्कराच्या वतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.
 

Related Articles